काश्मीरमधील हिंसाचाराचा अमरनाथ यात्रेवरही परिणाम
काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा अमरनाथ यात्रेवरही परिणाम झालाय. अमरनाथ यात्रेकरु श्रीनगरमध्येच अडकून पडले आहेत.
श्रीनगर : काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा अमरनाथ यात्रेवरही परिणाम झालाय. अमरनाथ यात्रेकरु श्रीनगरमध्येच अडकून पडले आहेत.
श्रीनगर-जम्मू हायवे सुरक्षेच्या कारणासाठी बंद करण्यात आलाय. बलताल बेसवरुन जम्मूसाठी काही बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या बसेसनं बरेचसे पर्यटक जम्मूमध्ये पोहोचले आहेत.
पण बसेस वेळेवर मिळत नसल्याचा काही पर्यटकांचा दावा आहे. त्यामुळे काही पर्यटक श्रीनगरमध्येच अडकून पडलेत. सगळ्या यात्रेकरुंना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातायत. काही यात्रेकरुंनी यात्रा अर्धवट सोडून आपापल्या गावी परतणं पसंत केलंय.