नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपणार आहे. पण त्याआधीच पुढचे राष्ट्रपती कोण होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रपती अमिताभ बच्चन हे ऐकायला तुम्हाला कसं वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांचे जवळचे मानले जाणारे ज्येष्ठ नेते अमर सिंग यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या राष्ट्रपतीपदासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव पुढे करण्याच्या विचारात आहे' असं वक्तव्य अमर सिंग यांनी केलं आहे.


झी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अमर सिंग म्हणाले की, 'बिग बींची मोदीशी ओळख मी करुन दिली जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मोदींनी बिग बींकडे गुजरातचे अँबेसेडर होण्याची मागणी ठेवली.' 


शरद पवार यांचं देखील नाव काही दिवसांपासून राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आहे. पण आता जर बिग बींचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे येत असल्याने या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे.