चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या समर्थकांनी त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या मरिना बीचवर जयललिता यांचं पार्थिव दफन करण्यात आलं त्याच बीचवर जयललितांच्या चहत्यांनी 68 किलो वजनाची इडली बनवली. या इडलीवर जयललिता यांचा चेहराही साकारण्यात आलाय. 


जयललिता यांनी भारतीय राजकारणात आपली वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या जाण्यानं तामिळनाडूच्या जनतेच्या मनावर मोठा आघात झाला होता. सुमारे 75 दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या जयललिता यांचं 5 डिसेंबर रोजी निधन झालं.