नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर ९ आणि १० नोव्हेंबरला बँक बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर नोटा बदली करण्याची प्रक्रिया सुरु झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने नोटा बदलण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. असं म्हटलं जातंय की तो पर्यंत बँकांजवळ १३ ते १४ लाख कोटी रुपये जमा होतील. सरकारने १० ते १८ नोव्हेंबरपर्यंत बँकामध्ये पैसे जमा केलेल्या पैशांची आणि बदली केल्या गेलेल्या रक्कमेची माहिती दिली आहे.


रिपोर्टनुसार आतापर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या ५ लाख ४४ हजार ५७१ रुपयाचं देणंघेणं झालं. देशभरात लोकांनी ३३ हजार ६ कोटी रुपये बदलले. ५ लाख ११ हजार ५६५ कोटी रुपये आतापर्यंत बँकामध्ये जमा झाले. १ लाख ३ हजार ३१६ रुपये देशातील विभिन्न एटीएममधून काढले गेले.