अनंतनाग : येत्या 25 मे रोजी प्रस्तावित काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातली पोट निवडणूक रद्द करण्यात आलीय. काश्मीरमधली परिस्थिती निवडणूक तणावपूर्ण असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी ही पोटनिवडणूक १२ एप्रिल रोजी होणार होती. पण काश्मीर खो-यातली परिस्थिती तणावग्रस्क असल्यानं निवडणूक 25 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली. 


मे 2014मध्ये विद्यमान मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती याच अनंतनागमधून खासदारकीची निवडणूक जिंकल्या. पण त्याचे वडिल मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर पीडीपीकडून त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. त्यामुळे अनंतनागमधून खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. 


येत्या काही दिवसात रमझान सुरु होतोय.. त्याप्रमाणे मेच्या अखेरीपासून अमरनाथ यात्राही सुरु होतेय...अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांवरील ताण लक्षात घेता नजीकच्या भविष्यात निवडणूक घेणं सोप नसल्यानं पोटनिवडणूक रद्दच करण्याची मागणी होतेय.