मंत्र्याच्या मुलाने केलं महिलेसोबत गैरवर्तन
बंजारा हिल्स येथील रस्ता क्रमांक १३ वर चालत जात असतांना कारमधील दोघांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यामध्ये एका मंत्र्याच्या मुलाचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे.
हैदराबाद : बंजारा हिल्स येथील रस्ता क्रमांक १३ वर चालत जात असतांना कारमधील दोघांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यामध्ये एका मंत्र्याच्या मुलाचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे.
महिलेने तक्रार केल्यानंतर आणि प्रकरण लोकांसमोर आल्यानंतर पोलिसांनी आंध्रप्रदेशमधील मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला नोटीस पाठवली आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी सुशील आणि त्याचा ड्राईव्हर अप्पाराव याला पोलीस स्थानकात उपस्थित राहण्याची नोटीस दिली आहे.
कारमध्ये बसलेले दोघेही महिलेला कारमध्ये येण्यास सांगत होते आणि त्यानंतर त्यांनी महिलेचा हात देखील पकडला त्यानंतर महिलेने आरडाओरड केल्याने तेथे लोकं जमली आणि या दोघांना पोलिसांच्या हवाले करण्यात आलं.
पोलिसांने या दोघांची चौकशी केल्यानंतर एक हा मंत्र्याचा मुलगा असल्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली गेली नव्हती पण मीडियातून बातमी समोर आल्यानंतर तक्रार केली गेल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांनी, महिला संघटना आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी या मंत्रीपुत्राला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.