नवी दिल्ली :  अनेक वेळा तुमचं तिकिट चार्ट प्रिपेड झाल्यानंतर कन्फर्म होत नाही, अनेक रूटला अशी अडचण नेहमीचीच असते, यावर रेल्वेने उपाय काढण्याचं ठरवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला कन्फर्म तिकिट न मिळाल्यास रेल्वे त्यासाठी त्याच रूटवर तासाभरात दुसरी रेल्वे सो़डणार आहे, रेल्वेच्या एका अधिकाऱ्य़ाने याला क्लोन ट्रेन असं नाव दिलं आहे. प्रचंड गर्दीच्या मार्गावर रेल्वे हा प्रयोग करणार आहे,


अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्ट असतात, पण शेवटपर्यंत वेटिंगवर राहिल्याने प्रवाशाचे सर्व वेळापत्रक कोलमडते, निराशा होते, रेल्वेचा मोठा महसूल बुडतो, यावर उपाय काढण्याचा हा प्रयत्न आहे.


भरगच्च गर्दी असलेले अनेक रूट आहेत, पण रेल्वेला अशा ट्रेन नेमक्या कोणत्या ठिकाणाहन सोडणे शक्य आहे, याची चाचपणी केली जात आहे, कारण तासाभराच्या आता रेल्वे इंजीन आणि सुस्थितीत असलेले डबे जोडून, गाडी वेळेवर सोडणे हे तसं काही सोपं काम नाही.


यातमुंबई सीएसटी, तेन्नई, सिकंदराबाद आणि नवी दिल्ली अशास्थानकांवरून 'क्लोन ट्रेन' सोडणे शक्य आहे. यासाठी संबंधित रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाची मर्यादा देखील काढून घेतली जाणार आहे.


सध्या कोणत्याही रेल्वेगाडीसाठी स्लीपर क्लासला ४००पर्यंत, थ्री टियर एसी किंवा चेअर कारसाठी ३०० पर्यंत, पहिल्या वर्गात ३० पर्यंत आणि सेंकड स्लिपर क्लास १०० पर्यंत प्रतिक्षायादीवरील तिकिटे दिली जातात.