जांलधर : रेलवे स्थानकावर एका ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची माहिती आल्यानंतर सगळीकडे गोंधळ उडाला. ट्रेनमध्ये सर्च ऑपरेशन केलं गेलं. स्टेशन मास्तरला फोन करुन एका अज्ञात व्यक्तींनी अर्चना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली होती.


तत्काळ जालंधर स्टेशनवर गाडी थांबवण्यात आली आणि सूचना मिळताच पोलीस आणि सेनेचे जवान ट्रेनला खाली करु लागले. सध्या डॉग स्क्वॉडच्या मदतीने सुरक्षारक्षक रेल्वेची तपासणी करत आहेत. ज्या नंबरवरुन फोन आला त्याला देखील ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही ट्रेन जम्मू येथून पटनाला जात होती.