नवी दिल्ली : भारतीय सेनेच्या २१ व्या बटालियनचे मेजर अमित देसवाल यांचा नक्षलवाद्यांना प्रत्यूत्तर देताना मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मणिपूरच्या तामेंगलेग जिल्ह्यातील जेडीयूएफ नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत देसवाल शहीद झालेत. सेनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष दल कर्मचाऱ्यांच्या शोध मोहिमेअंतरर्गत ही चकमक झाली... यामध्ये एक नक्षलवादीही मारला गेलाय. 


शहिद मेजर अमित देसवाल हे हरियाणाच्या झज्जरचे रहिवासी होते. चकमकीदरम्यान एक नक्षलवादी ठार झाल्यानंतर मेजर अमित यांना एक गोळी लागली. चकमक क्षेत्रातून जेव्हा त्यांना बाहेर आणण्यात आलं तेव्हा त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला होता. 


मेजर अमित यांचा मृतदेह आज त्यांच्या झज्जर गावी आणण्यात येईल. मेजर अमित राष्ट्रीय रायफलच्या स्पेशल फोर्समध्ये होते. १० जून २००६ रोजी त्यांनी आर्मी जॉईन केली होती. २०१६ मध्ये मणिपूरमध्ये त्यांचं पोस्टिंग 'ऑपरेशन हिफाजत' अंतर्गत करण्यात आलं होतं.