नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या जवानांना आधुनिक हेल्मेट देण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करी जवानांच्या सुरक्षेसाठी चिलखत उत्पादन करणाऱ्या कानपूर येथील एमकेयू  इंडस्ट्रीजला 1.58 लाख नवी हेल्मेट बनवण्याचे कंत्राट देण्यात आलं आहे. हे नवीन हेल्मेट 9 मिलीमीटरच्या गोळीचा मारा सहन करू शकेल अशा पद्धतीने ते तयार करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या भारतीय जवान जे हेल्मेट वापरतात ते 2.5 किलो वजनाचे आहे. त्यामुळे युद्धावेळी वापरण्यासाठी ते तितकेसे सुखकर ठरत नाही. हे कंत्राट 170 ते 180 कोटी रुपयांचे असून 3 वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे.


निमलष्करी दलाच्या विशेष तुकडीला अत्याधुनिक हेल्मेट मिळाल्यानंतर तब्बल दशकभरानंतर ही सुधारणा करण्यात आली आहे. त्यावेळी सैन्यदलाच्या विशेष तुकडीला आधुनिक इस्रायली OR-201 हे रिइनफोर्सड् प्लास्टिक ग्लासने बनलेले हेल्मेट देण्यात आले होते. नवीन हेल्मेटमुळे सैनिकांना अधिक संरक्षण मिळेल.