अमित शाह आणि जेटलींनी केली जयललितांच्या प्रकृतीची चौकशी
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह चेन्नईला आले आहेत. गेल्या 20 दिवसांपासून जयललिता चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तरीही प्रकृती बद्दल संपूर्ण राज्यात कमालीचा संभ्रम आहे.
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह चेन्नईला आले आहेत. त्यांच्यासोबत वित्तमंत्री अरुण जेटली देखील अपोलो रुग्णालयात पोहोचले. दोघांनीही जयललितांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी म्हणून दोघांनी ट्विटरवरुन प्रार्थना देखील केली.
गेल्या 20 दिवसांपासून जयललिता चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तरीही प्रकृती बद्दल संपूर्ण राज्यात कमालीचा संभ्रम आहे.
आपल्या नेत्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी समर्थकांनी पूजा अर्चना सुरू केली आहे. चेन्नईमध्ये आज अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदार, खासदारांनी यज्ञयाग आणि पूजा सुरू केली आहे. पूजा अर्चनांनी आपली आवडती अम्मा लवकरच बरी होईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.