नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटलींची 2015-16 सालची संपत्ती पंतप्रधान कार्यालयानं घोषित केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर ही माहिती टाकण्यात आली आहे. 2015-16मध्ये जेटलींची संपत्ती 2.83 कोटी रुपयांनी घटली आहे. बँक खात्यामधली रक्कम कमी झाल्यामुळे जेटलींची संपत्ती आता 68.41 कोटी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या आर्थिक वर्षाप्रमाणेच यंदाही घर आणि जमिनीची किंमत 34.49 कोटी रुपये असल्याचं जेटलींनी सांगितलं आहे. जेटलींच्या चार बँकांमध्ये एकूण 3.52 कोटी रुपये रक्कम आहे. याबरोबरच त्यांच्याकडे श्रीराम कंसॉलिडेटेड लिमिटेड आणि एंप्रो ऑईल लिमिटेड यांच्याबरोबरच इतर कंपन्यांमध्ये 17 कोटी रुपये आहेत. 


जेटलींकडे मार्च 2015 मध्ये 95.35 लाख रुपये रोख रक्कम होती, तीच मार्च 2016 मध्ये कमी होऊन 65.29 लाख रुपये झाली. पीपीएफ आणि अन्य गुंतवणूक मिळून ही रक्कम 11 कोटी रुपये आहे, जी एक वर्ष आधी 11.24 कोटी रुपये होती. 


जेटलींकडे असलेल्या सोनं, चांदी आणि हिऱ्यांची किंमत मार्च 2016 मध्ये वाढून 1.86 कोटी रुपये झाली आहे. ही किंमत मागच्या वर्षी 1.76 कोटी रुपये होती.