नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं बुधवारी मोदी सरकारला जोरदार झटका दिलाय. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योती प्रसाद राजखोवा यांनी सरकार अल्पमतात असल्याचा दावा करत राष्ट्रपती लागू करण्याची शिफारस केली होती. मात्र, राज्यपालांचा हा निर्णय कोर्टानं असंवैधानिक ठरवला. राज्यात १५ डिसेंबरपूर्वी असणारी स्थितीच पुन्हा लागू करावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.


अरुणाचल प्रदेशात पुन्हा एकदा नबाम तुकी सरकार प्रस्थापित करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळं अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा काँग्रेस सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झालाय. 


कोर्टाच्या निर्णयानुसार, १५ डिसेंबरनंतर दिले गेलेले सगळे निर्णय निष्प्रभावी मानले जातील. यामुळे, उत्तराखंडनंतर मोदी सरकारला दुसरा मोठा धक्का बसलाय.