अशोक पनगारिया आरबीआयचे गव्हर्नर व्हायची शक्यता
आरबीआयच्या गव्हर्नरपदी निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांची निवड व्हायची शक्यता आहे.
नवी दिल्ली : आरबीआयच्या गव्हर्नरपदी निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांची निवड व्हायची शक्यता आहे. याबाबत पुढच्या 48 तासांमध्ये अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार पंतप्रधान कार्यालय याबाबत 18 जुलैच्या आत निर्णय घेईल. पनगारिया हे पंतप्रधान मोदींचे पॉलीसी अॅडव्हायजर आहेत तसंच ते भारताच्या ग्रुप 20 समीटचेही सदस्य आहेत.
आत्ताचे आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाल 4 सप्टेंबरला संपतो आहे. रघुराम राजन यांच्यानंतर आरबीआयच्या गव्हर्नरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत पनगारिया?
पनगारिया हे भारतीय-अमेरिकन अर्थतज्ज्ञ आहेत. पनगारिया हे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे चीफ इकोनॉमिस्ट होते. याबरोबरच त्यांनी वर्ल्ड बँक, डब्ल्यूटीओ यांच्यासारख्या दिग्गज संस्थांमध्ये काम केलं आहे. पनगारिया यांना प्रिन्सटन यूनिव्हर्सिटीतून पीएचडी मिळाली आहे. 2015 मध्ये पनगारिया यांची निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.