गुवाहटी : पावसाचा देशभरात कहर पहायाला मिळतोय. आसामध्ये पूरानं कहर माजलाय.  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पुरामध्ये आतापर्यंत २६हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर ३६ लाख लोक बेघर झाले आहेत. दरम्यान, केंद्राकडून सहाशे कोटींचा मदत निधी जाहीर केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथल्या मदतकार्याचा आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग आसाममध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहाणी केली. राज्यातल्या २६ जिल्ह्यांना पुराचा अतोनात फटका बसला आहे. 


पुरामुळे बाधितांच्या बचाव आणि मदतीकरता एन डी आर एफची पथक युद्धपातळीवर काम करत आहेत. पूरस्थितीचा सामना करण्याकरता सहाशे कोटींहून अधिक रकमेचा निधी, केंद्रानं आसामला जाहीर केला आहे. याखेरीजही आसाम राज्याला केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन यावेळी राजनाथ सिंह यांनी दिले.