मुंबई : देशातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणारा 'अशोकचक्र' २०१७ साली आसाम रेजिमेंटचे शहिद हवालदार हंगपन दादा यांना दिला गेला... आसाम रेजिमेंटचं 'बदलूराम का बदन जमीन के निचे है... और हमे उसका राशन मिलता है' हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या आसाम रेजिमेंटच्या गाण्यामागे एक इतिहासही आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून हे गाणं या रेजिमेंटची ओळख बनलीय.



गाण्यामागचा इतिहास...


शहिद बदलूराम हे काल्पनिक पात्र नाही तर खरीखुरी कहाणी आहे... दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपान सैनिकांसोबत लढताना सैनिक बदलूराम शहिद झाले... परंतु, त्यांच्या क्वार्टर मास्टरनं मात्र आपल्या या सैनिकाच्या मृत्यूची नोंद न करता त्याच्या नावावर राशन घेणं सुरूच ठेवलं... अनेक महिने हा प्रकार सुरूच राहिला... परंतु, त्याचा फायदा बदलूरामच्या रेजिमेंटला झाला. 


जपान सैनिकांनी या रेजिमेंटला घेरल्यानंतर सैनिकांचा पुरवठा बंद झाला... पण, बदलूराम यांच्या नावावर जमा करण्यात आलेलं राशन जवळ असल्यानं सैनिकांना राशन तुटवडा जाणवला नाही... आणि अनेक मृत्यू टळले. 


त्यानंतर 'बदलूराम का बदन जमीन के निचे है... और हमे उसका राशन मिलता है' हे गाणं शिलाँगमध्ये आसाम रेजिमेंटच्या पासिंग परेडला (कसम परेड) ऐकायला मिळतंच... तुम्ही जर हे गाणं ऐकत असाल तर तुम्हीही या गाण्यावर थिरकल्याशिवाय राहू शकणार नाहीत.