नवी दिल्ली : पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. पंजाब आणि गोव्यामध्ये अनुक्रमे ७५ आणि ८३ टक्के मतदान झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमधील ११७ तर गोव्यातील ४० जागांसाठी हे मतदान झाले. केंद्रात सत्तेमध्ये असलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्यादृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.


गोव्यामध्ये मतदारांनी विक्रमी मतदान केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गोव्यामधील निवडणुका अत्यंत शांततापूर्वक झाली. गोव्यामधील निवडणुकीमध्ये १०० टक्के वेबकास्टिंग करण्यात आले आहे.


गेल्या वेळी भाजपची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी आघाडी होती. या वेळी भाजप स्वबळावर ३७  ठिकाणी काँग्रेस ३८ तर आप ३९ जागा लढवीत आहे.


दरम्यान, पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) सहभागाने उत्कंठा निर्माण केलेल्या पंजाबमध्ये ११७ जागांसाठी मतदान झाले. अकाली दल- भाजपकडून सत्ता हुसकावून घेण्यामध्ये ‘आप’ की काँग्रेस बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.