नवी दिल्ली : गोरक्षकांकडून देशभरात दलित आणि मुस्लिम समुदायावर हल्ले केले जात असल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. यासंबंधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि गुजरात, महाराष्ट्र, युपी, झारखंड, कर्नाटक आणि राजस्थान सरकारला ७ नोव्हेंबर रोजी भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक राज्यात गोरक्षकांना सरकारने ओळखपत्र देण्यात आलंय, बक्षीस देण्यात आली आहेत.  त्यामुळे सरकारने दुस-या व्यवस्थेला अधिकार दिलाय. हा प्रकार सलवा जुडूमसारखा असल्याचे याचिकाकर्ते शहजाद पुनावाला यांनी म्हटले आहे. 


पुनावाला यांनी गुजरातमधल्या उना आणि देशभरातील अन्य ठिकाणी गोरक्षकांनी दलित आणि मुस्लिम समुदायावार केलेल्या हल्ल्यांची माहितीही सुप्रीम कोर्टात सादर केली.