ऑटो एक्स्पो २०१६ : मारुती, महिंद्रा, टोयोटो, फियाट आणि...
ऑटो एक्सपोच्या दुस-या दिवशी महिंद्रा अँड महिंद्राचा बोलबाला राहिला. पाहुयात कसा होता ऑटो एक्स्पोचा दुसरा दिवस...
नोएडा : ऑटो एक्सपोच्या दुस-या दिवशी महिंद्रा अँड महिंद्राचा बोलबाला राहिला. पाहुयात कसा होता ऑटो एक्स्पोचा दुसरा दिवस...
ऑटो मोबाईल्सचा महाकुंभ दिल्लीत सुरु आहे. भविष्यात रस्त्यावर धावणाऱ्या अनेक कार्सचा फर्स्ट लूक इथे पाहायला मिळाला.
मारुती
ऑटो एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी मारुति सुजुकीनं प्रीमियम हैचबैक सेग्मेंटमधली कॉन्सेप्ट कार 'इगनिस' आणि 'बॅलेनो'चं नवं व्हर्जन सादर केलं. इगनिस 4 मीटरपेक्षाही छोटी गाडी आहे. मारुतिनं या गाडीला हैचबैक क्रॉस एसयूवीचं नाव दिलंय. अशी गाडी जी हॅचबॅक असेल पण तिचा लूक एसयूव्हीसारखा असेल. 'इगनिस'ची स्पर्धा 'फोर्ड इकोस्पोर्ट' आणि महिंद्राच्या 'केयूव्ही १००' सोबत असेल.
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा
महिंद्रा आणि महिंद्रानं ऑटो एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी XUV Aero Concept लॉन्च केली. कूप स्टाईलची ही एसयूव्ही आहे. ही गाडी देशातली पहिली कूप स्टाईल एसयुव्ही असेल. XUV Aero ची स्पर्धा Mercedes-Benz GLE Class आणि BMW X6 शी असेल. Aero मध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. या कारमध्ये चार प्रकारचे ड्रायव्हिंग ऑप्शन्स देण्यात आलेत. ज्यामध्ये रेस, ऑफ रोड, स्ट्रीट आणि स्पोर्ट असे प्रकार असतील.
महिंद्रानं टू सीटर इलेक्ट्रिक कारही लॉन्च केली. ई२ओ स्पोर्ट असं या कारचं नाव आहे. लिथियम ऑयन बॅटरीवर चालणारी ही गाडी केवळ आठ सेकंदांमध्ये 100 किलोमीटरचा वेग गाठू शकते.
महिंद्रानं कमर्शियल व्हेहिकल सेगमेंटमध्ये ब्लेज़ो ट्रकही लॉन्च केलाय. त्याची किंमत २५ ते ३० लाख रुपये इतकी आहे. या ट्रकचं इंजिन भारतात तयार करण्यात आलंय.
टोयोटा
टोटोटानं त्यांची फ्लैगशिप 'एमयूव्ही इनोव्हा'ला नव्या लूकमध्ये सादर केलंय. Innova Crysta पहिल्यापेक्षा जास्त मोठी आणि प्रीमियम आहे. तिचा पुढचा भाग पहिल्यापेक्षा जास्त स्लीक आहे.
फियाट
'फियाट'नं ऑटो एक्सपोमध्ये तीन नव्या गाड्या लॉन्च केल्या. त्यामध्ये Punto Pure, Urban Cross आणि Linea 125S यांचा समावेश आहे. Linea 125S जूनमध्ये बाजारात येईल.