दिल्ली : रजनीश ग्रोवर उर्फ अशोक कुमार उर्फ मन्नत वाले बाबा या बाबाबाबत मोठा खुलासा झाला आहे. जयपूरच्या एका मुलीने सोमवारी या ढोंगी बाबाचा पर्दाफाश केला आहे. दिल्लीमधील फार्म हाउसमध्ये या बाबाने संमोहनद्वारे ३ महिलांना बंधक बनवून ठेवलं आहे. पोलिसांनाही या सूचना मिळाल्या आहेत की बाबा रजनीश ग्रोवरने १० दिवसापूर्वी मलेशियाचा वीजा घेतला आहे. त्यामुळे ते मलेशिया फरार होऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्संगच्या नावाखाली महिलांवर बलात्कार


सत्संगच्या नावाखाली महिलांवर हा बाबा अत्याचार करत असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. फार्म हाऊसवर सत्संगच्या नावाखाली महिलांवर बाबा बलात्कार करत असल्याचं एका तरुणीने पोलिसांना सांगितलं आहे. बाबा ब्लॅकमेल करुन लैगिंक शोषण करत असल्याचंही समोर आलं आहे. या ढोंगी बाबाने एका व्यापारीच्या घरी गेला तेव्हा सेवेच्या नावाखाली त्याच्या मुलीवर बलात्कार केला. ज्यांना पिता आणि पती नसायचे अशा महिलांना हा बाबा टार्गेट करुन त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर अत्याचार करायचा.