`सरकार अस्थिर करण्यामागे बाबा रामदेव`
उत्तराखंडमधलं मुख्यमंत्री हरीश रावत यांचं सरकार अस्थिर करण्यामागे योगगुरु बाबा रामदेव यांचा हात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे.
डेहराडून: उत्तराखंडमधलं मुख्यमंत्री हरीश रावत यांचं सरकार अस्थिर करण्यामागे योगगुरु बाबा रामदेव यांचा हात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या 9 आमदारांनी तिथल्या सरकारला अडचणीत आणलं आहे. हे आमदार रामदेव बाबांच्या संपर्कात होते, त्यांनी या आमदारांना चिथावणी दिली, या संभाषणाचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा काँग्रेसनं केला आहे. बाबा रामदेव आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सरकार पाडण्याचा कट रचला आहे, असा आरोपही काँग्रेसनं केला आहे.
बाबा रामदेव यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणत्याही आमदाराशी बोललो नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. तसंच मी जे करतो ते खुलेपणानं करतो, कोणताही छुपा अजेंडा ठेवत नाही, असंही बाबा रामदेव म्हणाले आहेत.
28 मार्चला उत्तराखंडमध्ये हरीश रावत यांना आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यामुळे 28 तारखेला उत्तराखंडमध्ये काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.