नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या योगामुळे अनेकांना प्रभावित केलं आहे. पण रविवारी बाबा रामदेव यांनी फूटबॉलचं मैदानही गाजवलं. बॉलीवूड अभिनेत्यांचा संघ आणि संसद सदस्यांचा संघ यांच्यामध्ये दिल्लीत फूटबॉल मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वच्छ भारत अभियान आणि महिला सक्षमीकरण या सरकारच्या योजनांबद्दल जनजागृती करण्यासाठी ही मॅच खेळवण्यात आली. या मॅचमध्ये रामदेव बाबांनीही भाग घेतला.