बाबा रामदेव यांच्या अपघाताचे वृत्त चुकीचे
बाबा रामदेव यांच्या गाडीला अपघात झाला, असे वृत्त सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, हे वृत्त चुकीचे आहे. केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झालेय.
मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांच्या गाडीला अपघात झाला, असे वृत्त सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, हे वृत्त चुकीचे आहे. केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झालेय. दरम्यान, पतंजली ट्रस्टकडूनच एक पत्रक जारी करण्यात आलेय. या वृत्ताचे खंडन करण्यात आलेय.
रस्ता अपघाताबाबत बाबा रामदेव यांच्या गाडीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात बाबा रामदेव यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, ही निव्वळ अफवा असून रामदेव बाबा सुखरूप आहे.
रामदेव बाबा यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांना एका अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात घेऊन जात असल्याचा फोटोही याबातमीसोबत व्हॉयरल होत आहे. मात्र, सोशल मीडियावर हा कुणी तरी खोडसाळपणा केलाय, असे पतंजली ट्रस्टकडून सांगण्यात आलेय. 2011चा हा जुना फोटो असल्याचे म्हटले जात आहे. रस्ता अपघातचे वृत्त हे खोटे आहे. रामदेव बाबांची प्रकृती ठणठणीत आणि उत्तम आहे पतंजली ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलेय.