नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकारण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे. दादरीनंतर आता अयोध्या प्रकरणातील नवीन खुलासा समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणी केलाय खुलासा


पूर्व आय.पी.एस अधिकारी किशोर कुणाल लिखित 'अयोध्या रिविझिटेड' पुस्तकात त्यांनी नमूद केले की, अयोध्येतील राम मंदीर हे बाबरच्या राज्यात नाही तर औरंगजेबच्या राज्यात तोडण्यात आले होते. या पुस्तकात त्यांनी अयोध्या प्रकरणाची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यामते अयोध्या प्रकरणातील अनेक बाबींचा अजून खुलासा झाला नाहीये. बाबर कधी अयोध्यामध्ये गेलाच नव्हता त्यामुळे त्याने राम मंदिर पाडणे शक्यच नाही.


काय आहेत पुरावे


ब्रिटीश काळातील काही कागदपत्रे, काही प्राचीन संस्कृत ग्रंथ, पुरातत्व उत्खनन या गोष्टीचा पुरावा आहेत की अयोध्यामध्ये राम मंदिर होते आणि ते पाडून त्या ठिकाणी मस्जिद बांधण्यात आली होती.


या पुस्तकात नमूद केलेल्या मुद्यांनी अयोध्या प्रकरणातील अनेक लोकांचे विचार आणि मते बदलतील तसेच वाद मिटतील आणि भारतातील जातीय भेददेखील थांबतील अशी आशा किशोक कुणाल यांनी व्यक्त केलीये.