नवी दिल्ली : बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा फैसला आता उद्यावर ढकलण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी म्हणून या नेत्यांची नावं वगळू नयेत, अशी विनंती सीबीआयने या आधीच केली होती. दरम्यान या प्रकरणी उद्या खंडपीठ सुनावणी करेल असा खुलासा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या 13 नेत्यांवर बाबरी मशीद प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल आहे. 


या 13 जणांची नावं सीबीआयनं अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयानं ती नावं काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उद्या निर्णय दिला जाईल.