अजब... चक्क बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या
देहराडून : उत्तराखंड राज्यातील दून मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे.
देहराडून : उत्तराखंड राज्यातील दून मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. इथे जन्म झालेल्या एका बाळाला दोन डोकी आहेत. हे यापूर्वीही तुम्ही ऐकलं असेल तरी या बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या आहेत. असे असले तरी या बाळाला हृदय एकच आहे.
शनिवारी दुपारी टिहरी गढवाल जिल्ह्यातील धनोल्टी तहसील गावातील एका गरोदर महिलेला दून मेडिकल कॉ़लेजमध्ये भरती केलं गेलं. एका शस्त्रक्रियेद्वारे या महिलेची प्रसुती केली गेली. प्राथमिकपणे पाहता या बाळाचे एक धड असले तरी त्याला दोन शीरं आहेत. यानंतर या बाळाच्या केल्या गेलेल्या आंतरिक शारीरिक तपासणीत या बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या असल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या बाळाचं आयुष्य कमी असणार आहे.
हिंदुस्थान या वृत्तपत्राने हे वृत्त दिलेय. मुलाखतीत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले, या मुलाच्या अजून काही तपासण्या होणे अद्याप बाकी आहे. या बाळाला श्वास घेण्यासही समस्या उद्भवत आहेत. बालरोगतज्ज्ञांचाही सल्ला सध्या घेतला जात आहेत. या मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. गरज पडल्यास या मुलाला दिल्लीला नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरम्यान या मुलाचे आई - वडील मात्र चिंतेत आहे. आपली गुजराण करण्यासाठी हे दोघेही मजुरी करतात. आता हे बाळ जरी जगले तरी अशी दोन शीरं असलेल्या बाळाला कसे सांभाळावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे