चेन्नई : येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण तामिळनाडू राज्यात पेप्सी आणि कोक या कंपन्यांची उत्पादनं बाजारात दिसणार नाहीत.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या ट्रेडर्स फेडरेशन युनियननं या दोन कंपन्यांची उत्पादनं न विकण्याचा निर्णय घेतलाय. 


स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांच्या आरोग्याच्या काळजीतून संघटनेनं हा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे, अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवलाय. 


हॉटेल, मॉल यांनीही पेप्सी आणि कोकच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचं आवाहन युनियननं केलंय. तामिळनाडूतल्या PMKचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री अंबुमणी रामदोस यांनी या निर्णय़ाला पाठिंबा दिलाय. 


नुयी आल्या भारतात...


विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये बंदीची घोषणा पेप्सीकोच्या अध्यक्षा आणि CEO इंद्रा नुयी भारतात असतानाच झालीये. नुयी देशामध्ये व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांबाबत त्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशीही चर्चा केली. पेप्सीकोसाठी भारत हा पाच मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे.


देशात कंपनीचे 42 प्लांट आहेत. त्यामध्ये वाढ करण्याची कंपनीची योजना असतानाच तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यात बंदी येत असल्यानं या प्रयत्नांना खिळ बसण्याची शक्यता आहे.