चेन्नई : कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात १० प्रवासी जखमी झालेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमी प्रवाश्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल सक्सेना यांनी दिली. तामिळनाडूतील वेल्लोरे जिल्ह्यातील सोमानयाकानपट्टी आणि पाटचूर रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला.


या अपघातात एकूण ११ डब्यांचे नुकसान झाले. आठ डबे रुळावरुन घसरले तर, तीन डबे पलटी झालेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु होते. 
या अपघातामुळे चेन्नई-बंगळुरु मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


दरम्यान, दक्षिण रेल्वेने चेन्नई-बंगळुरु दरम्यान धावणाऱ्या काही गाडया रद्द केल्यात.