नवी दिल्ली : तुमचं बँक किंवा इतर वित्तीय खातं आधार कार्डाला लिंक नसेल तर ते खातं बंद करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. ३० एप्रिलपर्यंत अशी खाती आधार कार्डला लिंक केली नाहीत तर तुमचं आर्थिक नुकसान व्हायची शक्यता आहे. बँक, विमा आणि शेअरच्या खात्यांचा यामध्ये समावेश आहे. जुलै २०१४ ते ऑगस्ट २०१५ मध्ये बँक खाती उघडलेल्यांना आधारनं लिंक करावं लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉरेन टॅक्स कॉम्प्लायन्स अॅक्ट म्हणजेच एफएटीसीएमधल्या नियमांनुसार आधार कार्ड हे खात्याशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आधार कार्ड लिंक केली नाहीत तर बँक खाती गोठवण्याचा अधिकार बँकांना देण्यात आला आहे. तसंच ही खाती पुन्हा सुरु करायची असल्यास खातेदारकांना आधार कार्ड आणि इतर संबंधित कागदपत्र बँकेमध्ये द्यावी लागणार आहेत.