या ३ बँकांनी दिल्या एटीएम कार्डाचा पीन बदलण्याच्या सूचना
ग्राहकांना फसवणारे अनेक फोन येत असतात ज्यामध्ये फोनवर बोलणारा व्यक्ती हा तुमच्याकडे तुमच्या एटीएम कार्डाची माहिती मागत असतो. आपण बँकेतून बोलत आहोत अशी बतावणी करुन हे लोकं तुमच्या एटीएमची माहिती विचारतात आणि मग तुमचे पैसे परस्पर गायब केले जातात.
मुंबई : ग्राहकांना फसवणारे अनेक फोन येत असतात ज्यामध्ये फोनवर बोलणारा व्यक्ती हा तुमच्याकडे तुमच्या एटीएम कार्डाची माहिती मागत असतो. आपण बँकेतून बोलत आहोत अशी बतावणी करुन हे लोकं तुमच्या एटीएमची माहिती विचारतात आणि मग तुमचे पैसे परस्पर गायब केले जातात.
केरळमध्ये ग्राहकांच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडली आहे. त्यामुळे एचडीएफसी, फेडरल बँक आणि डीबीएस बँकेने आपल्या ग्राहकांना एटीएम पीन बदलण्याची सूचना केली आहे. तुमच्या बँकेनं तुम्हाला एटीएम कार्डचा पीन बदलण्यास सांगितलं असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. बॅकेतूनच फोन आला आहे का ही खात्री करुन घ्या. कोणतीही माहिती बँक फोनवर विचारत नाहीत. त्यामुळे एटीएम कार्ड नंबर, पीन नंबर कोणाला देऊ नका.
एचडीएफसी, फेडरल बँक आणि डीबीएस बँकांचा डेटा लीक झाल्याची भीती वर्तवली जात आहे. तुमचा एटीएम पीन बँकेतल्या कुठल्याही व्यक्तीसोबत शेअर करु नका, असं आवाहनही करण्यात आले आहे.