बँकांना शेवटच्या आठवड्यात ५ दिवस सुटी
मुंबई : मार्च एण्डच्या शेवटच्या आठवड्यात ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे करोडो रूपयांच्या व्यवहारावर परिणामाची शक्यता आहे.
बँका २३ पासून ते २७ मार्चपर्यंत सलग ५ दिवस बंद असणार आहेत. म्हणून बँकांशी संबंधित व्यवहार तातडीने पूर्ण करा, अन्यथा आपल्याला मनस्ताप सहन करावा लागेल.
धूलिवंदन, गुड फ्रायडे दरम्यान बँकांना सुटी राहणार आहे. पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करता येईल. मात्र, सण-उत्सवांच्या काळात एटीएममधील पैसेही संपण्याची शक्यता आहे.
आरबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार...
२३ मार्च - होळी
२४ मार्च - धूलिवंदन
२५ मार्च - गुड फ्रायडे
२६ मार्च - महिन्याचा चौथा शनिवार
२७ मार्च - रविवार साप्ताहिक सुटी