नवी दिल्ली : नवे वर्ष सुरु होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यास लोक उत्सुक झालेत. अनेक हॉटेल्स, बार, पबमध्ये थर्टीफर्स्ट निमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच काहीशी वेगळी घोषणा सोशल ऑफलाईन नावाच्या बारने केलीये. मुंबई, दिल्ली आणि बंगळूरुमध्ये असलेल्यया बारने ही घोषणा केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी ते भाषणात जितक्या वेळा मित्रों हा शब्द बोलतील तेव्हा बारमध्ये उपस्थित लोकांना ३१ रुपयांत बीअर अथवा ड्रिंकचा एक शॉट देण्यात येणार आहे. 


नोटाबंदीला ५० दिवस झाल्यानंतर मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. सोशल ऑफलाईनप्रमाणे अन्य बारर्सनीही मोदींचे भाषण लाईव्ह दाखवण्याचा निर्णय़ घेतलाय.