नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोवा यांनी हवाई दलाच्या सर्व अधिकाऱ्यांना कमी वेळेत मोठी कारवाई करण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. धनोवा यांचं हे पत्र हवाई दलाच्या जवळपास 12,000 अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रावर 30 मार्चची स्वाक्षरी आहे. धनोवा हे हवाई दलाचे प्रमुख बनल्यानंतर त्यांनी ३ महिन्यानंतर हे पत्र लिहिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनोवा यांनी सध्या स्थितीवर जी पाकिस्तानकडून लपून हल्ले होतायंत त्यावर ही गोष्ट म्हटली आहे. असं पहिल्यांदा झालं आहे की, हवाई दलाच्या प्रमुखांनी पत्राद्वारे अधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली आहे. त्यांनी भारताच्या आजुबाजुला वाढता धोका पाहता अलर्ट केलं आहे. कोणत्याही क्षणी खूप कमी वेळात कारवाईसाठी बोलवलं जाऊ शकतं असं त्यांनी म्हटलं आहे.


हवाई दलाकडे संसाधनांची कमी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. आपल्याला स्वत: नव्या नव्या तांत्रिक गोष्टींची अपडेट असली पाहिजे. याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. प्रमोशन आणि असाइनमेंटमध्ये भेदभाव बाबतही त्यांनी या पत्रामध्ये लिहिलं असल्याचं बोललं जातंय. कोणत्याही प्रकारचा पक्षपात, यौन शोषणाच्या घटना सहन नाही केल्या जाणार असं देखील म्हटलं आहे.