दोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...
मध्य प्रदेश इटारसीमध्ये एका तरुणाला धावत्या रेल्वेच्या खिडकीला बांधून जोरदार मारहाण करण्यात आली.
इटारसी : मध्य प्रदेश इटारसीमध्ये एका तरुणाला धावत्या रेल्वेच्या खिडकीला बांधून जोरदार मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची चुकी एकच होते त्याने न विचारता दोन घोट पाणी प्यायल्याची!
या तरुणांने तोंड लावून बाटलीतील पाणी प्राशन केले. त्यानंतर मित्रांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आपल्या मित्राला रेल्वेच्या खिडकीला बाहेरुन कपडे काढून चक्क बांधले. त्यानंतर खिडकीला बांधलेल्या तरुणाला पट्ट्याने जोरदार मारहाण करण्यात आली.
दरम्यान, ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. पिडीत तरुण मुंबीत परीक्षा देण्यासाठी येत होता. तो जबलपूरवरुन रेल्वेतून प्रवास करीत होता. अमानुष मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. ज्या ज्या स्टेशनवर रेल्वे थांबत होती. त्यात्या ठिकाणी त्याची जोरदार पिटाई करण्यात येत होती. ही घटना २५ मार्चची असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.