कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एका अभिनेत्रीचा मृतदेह हा तिच्या राहत्या घरी सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत सापडला. अभिनेत्रीच्या मनगटाची नस कापलेली होती. ही आत्महत्या आहे हत्या हे अजून स्पष्ट झालेलं नाही.


दोन दिवसापासून अभिनेत्री बिस्ताता साहा ही फोन उचलत नव्हती. त्यानंतर तिची आई तिच्या घरी आली. जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. फ्लॅटमध्ये ती अभिनेत्री एकटीच राहत होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर थोडं चित्र स्पष्ट होईल.