बंगळुरू : होणारा नवरा मुलगा आपला लाडका कुत्रा घरी ठेवायला तयार नसल्याचं पाहत कृष्णा वालिया नावाच्या एका तरुणीनं सरळ सरळ लग्नालाच नकार देऊन टाकलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरूची रहिवासी असलेल्या कृष्णानं शेअर केलेल्या एका फोटोची आणि तिच्या न होणाऱ्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. कृष्णाच्या होणाऱ्या पतीला कुत्रा आवडत नाही आणि लग्नानंतर या कुत्र्याला कृष्णाने घरी आणू नये, असं त्यानं तिला बजावायचा प्रयत्न केला होता. 

कृष्णा आणि संबंधित मुलाचा फेसबुक चॅटवरील खाजगी संवाद यामुळे व्हायरल झालाय. कृष्णाच्या आईला हा मुलगा आपल्या मुलीसाठी योग्य 'वर' वाटत होता. परंतु, कृष्णानं आपल्या आयुष्यात पाळीव प्राण्यांपेक्षा बाकीच्या गोष्टींना जास्त प्राधान्य दयावं, असं या मुलानं सांगितलं होतं. यावर 'मी कुणासाठी माझ्या कुत्र्याला सोडू शकत नाही' असं म्हणत कृष्णानं त्या मुलाला स्पष्ट शब्दांत म्हटलं.


यानंतर, तू आपल्या कुत्र्याबरोबरचं लग्न करावस, असं मुलानं कृष्णाला म्हटलं. यानंतर कृष्णानं हे नात पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. यानंतर कृष्णाच्या फेसबुकच्या चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावर अनेक लोक आपली वेगवेगळी मतं मांडत आहेत.