अनुष्काने घेतले कोऱ्या कागदावर लेकरांच्या पायांचे ठसे, विराटला ही माहित नाही कारण

अनुष्का शर्माने खास विराट कोहलीसाठी केलेल्या पोस्टने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

Jun 16, 2024, 18:49 PM IST
1/7

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जोडीला सोशल मीडियावर कायमच चाहत्यांकडून भरभरुन प्रेम दिलं जातं. 

2/7

16 जून हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. या फादर्स डेला सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.  

3/7

अशातच अनुष्का शर्माने हटके स्टाईलमध्ये फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. 

4/7

फादर्स डेच्या निमित्ताने अनुष्काने शेअर केलेल्या फोटोचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.   

5/7

एका कोऱ्या कागदावर पायांचे ठसे आणि त्यावर लाल आणि हिरव्या रंगाने हॅप्पी फादर्स डे असं लिहिलं आहे. 

6/7

हा फोटो विराटला टॅग करत, अनुष्काने तिच्या दोन्ही मुलांच्या वतीने फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजूनही या सरप्राईज बाबत विराटने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.        

7/7

विराट कोहली सध्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताबाहेर असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्काने विराटला फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.