लखनौ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी 'भारत माता की जय' ही घोषणा देण्यासाठी कोणावर जबरदस्ती नको, असे आवाहन यांनी स्वयंसेवकांना केले. राष्ट्रवादाच्या घोषणा बंधनकारक नाहीत, त्या स्वेच्छेने दिल्या पाहिजेत. प्रत्येकजण आपला आहे, आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांनी स्वतःहून 'भारत माता की जय'  घोषणा दिली पाहिजे. यासाठी कोणावर दबाव टाकू नये. नागरिकांच्या आतून ही घोषणा ओठांवर आली पाहिजे, असे ऐतिहासिक 'स्मृती भवन' लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी भागवत यांनी सांगितले.


संपूर्ण जगाने ‘भारत माता की जय‘ बोलावे, अशी आमची इच्छा असल्याचे भागवत यांनी रविवारी कोलकता येथे म्हटले होते. दरम्यान, एआयएमआयएम'चे नेते असदउद्दीन ओवैसी यांनी आपल्या मानेवर सुरी ठेवली तरी ‘भारत माता की जय‘ असे बोलणार नसल्याचे म्हटले होते, यानंतर या वादाला सुरूवात झाली होती.