नवीन नोटांच्या रंग निघण्यावर केंद्र सरकारचा सर्वात मोठा खुलासा
सोशल मीडियावर २ हजारांच्या नोटांचा रंग उडत असल्याची बातमी व्हायरल होत असताना लोकांचा दावा होता की या नोटेची गुणवत्ता खूप खराब आहे आणि या नोटेचा रंग उडून जातो आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर २ हजारांच्या नोटांचा रंग उडत असल्याची बातमी व्हायरल होत असताना लोकांचा दावा होता की या नोटेची गुणवत्ता खूप खराब आहे आणि या नोटेचा रंग उडून जातो आहे.
काही जणांनी ही नोट फाडून त्यातील चीप शोधण्याचा प्रयत्न केला. आता लोक पाण्यात टाकून याची वॉटर टेस्ट करून पाहत आहेत. तुमच्या नोटेवर पाणी टाकले आणि नोटेचा रंग निघत असेल तर ती खोटी असल्याचा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा.
जुन्या नोटा आणि नव्या नोटांची शाई एकच आहे, असे अर्थ खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
नोटेने रंग सोडला नाही तर ती खोटी नोट...
शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की नोटेने रंग सोडला नाही, तर ती खोटी नोट असणार आहे. सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका.