लाहोर : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांनी हेरगिरी प्रकरणात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाला विरोध केला आहे. हा मुद्दा वादग्रस्त आहे पण त्यांचा पक्ष सैद्धांतिक रूपनाने मृत्यूदंडाच्या विरोधात आहे. 


कुलभूषण जाधवांचा मुद्दा वादग्रस्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिलावलने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भारतीय हेर कुलभूषण जाधव यांचा मुद्दा वादग्रस्त आहे. त्याला पाकिस्तानात असायला नको होते. यावेळी आपल्या आजोबा जुल्फीकार अली भुट्टो यांनाही मृत्यूदंड देण्यात आला होता, याची आठवण भुट्टो यांनी काढली. 


जाधवांच्या मृत्यूदंडावर भारताची प्रतिक्रिया स्वाभाविक 


पीपीपी पंजाबचे अध्यक्ष आणि माजी संघीय सूचना मंत्री कमर मजा कैरा म्हणाले की जाधव यांच्या मृत्यूदंडावर भारताची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. ते म्हणाले, नवाज शरीफ सरकार जाधवच्या आरोपपत्रावर जगाला योग्य गोष्टी सांगण्यास  कमी पडले आहेत. 


सुप्रीम कोर्टाने अपील करू शकतात जाधव 


पाकिस्तानचे माजी अटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान म्हणाले की जाधव आपल्या शिक्षे विरोधात सेना प्रमुख तसेच उच्च न्यायालयात अपील करू शकतात. तसेच आपली याचिका रद्द झाल्यावर ते राष्ट्राध्यक्षांकडे दया याचना करू शकतात.