बिल गेट्स यांनी केलं मोदींच्या `त्या` निर्णयाचं स्वागत
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बिल गेट्स यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारच्या या निर्णयाने देशातील शॅडो इकोनॉमीला संपवण्यास मदत होईल आणि कॅशलेस इकोनॉमी वाढण्यास मदत होईल. नीती आयोगाने आयोजित केलेल्या ट्रांसफॉर्मिंग इंडियाच्या लेक्टरच्या दुसऱ्या सीरीजमध्ये बिल गेट्स यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपली मत मांडली.
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बिल गेट्स यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारच्या या निर्णयाने देशातील शॅडो इकोनॉमीला संपवण्यास मदत होईल आणि कॅशलेस इकोनॉमी वाढण्यास मदत होईल. नीती आयोगाने आयोजित केलेल्या ट्रांसफॉर्मिंग इंडियाच्या लेक्टरच्या दुसऱ्या सीरीजमध्ये बिल गेट्स यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपली मत मांडली.
तंत्रज्ञानाचं महत्त्व सांगत मी त्याच्यावर खूप विश्वास ठेवतो असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. 'पण तंत्रज्ञान हे तेव्हा शक्तीशाली असतं जेव्हा त्याचा वापर करणारे मजबूत असतात. रेग्युलेशंस अँड सिस्टम्ससाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे फायद्याचं आहे. तंत्रज्ञान हे तेव्हा दीर्घकाळ टिकू शकतं जेव्हा जगात आपण असू, त्यामध्ये स्थिरता असेल.'
भारताच्या प्रयत्नांबाबत त्यांनी म्हटलं की, 'भारत जे करण्याचा प्रयत्न करतोय ते जगातील इतर कोणत्याच देशाने नाही सूचवलं. भारताला माहित आहे की त्यांना येणाऱ्या काळात कोणत्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे. सरकार देखील त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असल्याचं दिसतंय.'