नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल बिपीन रावत भारताचे नवे लष्करप्रमुख बनलेत. सेनाध्यक्ष दलबीरसिंग सुहाग यांच्याकडून त्यांनी लष्करप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच जनरल सुहाग आपल्या पदावरून सेवानिवृत्त झालेत. दलबीर सिंग सुहाग यांना अखेरच्या दिवशी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.


पदभार स्वीकारण्याआधी बिपीन रावत यांनी अमर जवान ज्योति इथं जाऊन शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. उत्तर भारतातील दहशतवाद तसंच पश्चिममध्ये सुरू असलेलं छुपं युद्ध या परिस्थितीत समोर येणाऱ्या आव्हानांसाठी रावत या पदासाठी योग्य असल्यानं त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलीय.


सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट जनरल राव यांच्याकडे गेल्या तीन दशकांपासून भारतीय सेनेत वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्याचा तसंच युद्ध क्षेत्रात काम करण्याचा व्यावसायिक अनुभव आहे.