नवी दिल्ली : विजय चौक इथं बीटींग द रिट्रीटचा सोहळा रंगतोय. प्रजासत्ताकाचा गौरव असंही या सोहळ्याला संबोधलं जाऊ शकतं. चार दिवसीय प्रजासत्ताक दिनाचा समारोप या बीटींग द रिट्रीट सोहळ्यानं होतो.


प्रजासत्ताक दिनी भारताच्या सैन्य दलाच्या सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवल्यानंतर बीटींग द रिट्रीटमध्ये सैन्य दलाचे बँड पारंपरिक सूरांच्या तालावर मार्च काढतात. देशभक्तीचे हे सूर जवानांमध्ये नवा जोष संचारतो. या सूरांमुळे त्यांची हिंमत, धैर्य कित्येकपटीनं वाढते. यंदाच्या बीटींग द रिट्रीट सोहळ्यात 26 सूर ऐकायला मिळाले.