नवी दिल्ली : आज भाजपचा स्थापना दिवस.... त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयात जाऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह विविध नेते यावेळी उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या 37 व्या स्थापना दिनानिमित्तानं नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संघर्षाची आठवण ठेवण्याचे धडे दिलेत. तसंच आपला पक्ष देशातील गरीब जनांची उत्साहात सेवा करत राहील, असं आश्वासनही दिलं.  

1951 साली श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. 1977 सालच्या आणीबाणीनंतर जनसंघ आणि इतर पक्ष एकत्र येऊन त्यांनी सर्वसाधारण निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव केला. त्यानंतर 6 एप्रिल 1980 साली जनता पार्टीची भारतीय जनता पार्टी झाली. आज भाजपला 36 वर्षं पूर्ण झाली. 


आज भाजपची देशातल्या पंधरा राज्यांमध्ये सत्ता आहे. त्यात नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं, आजचा हा स्थापना दिवस भाजपसाठी जास्त आनंदाचा असणार आहे.