उडपी : कर्नाटकच्या सीमाभागातील उडपी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार, भाजपच्या एका सक्रिय कार्यकर्त्याला विश्व हिंदु परिषद आणि हिंदु जागरण वेदिकच्या कार्यकर्त्यांनी जीवजाईपर्यंत मारहाण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उडपी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख केपी बालकृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण पुजारी या भाजप कार्यकर्त्यावर विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते आणि हिंदु जागरण वेदिकच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, जेव्हा दोन गाई कथित घटनेनुसार भाजप कार्यकर्ता कत्तलखान्यात घेऊन जात होता


बालकृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण पुजारी यांच्या बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास हल्ला झाला आणि रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पुजारी यांचा मृत्यू झाला.


प्रवीण यांच्यासोबत अक्षय देवदिगाही होते, ज्यांना व्हिएचपी आणि हिदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मारलं. अक्षयवर उपचार सुरू आहेत.


प्रवीण पुजारी हे कत्तलखान्यात गाय घेऊन जात आहेत, हे समजल्यावर व्हिएचपी आणि एचजेव्हीच्या एकूण २० कार्यकर्त्यांनी, गाय घेऊन जाणारी गाडी अडवली आणि त्यांच्यावर हल्ला केला. 


दोन्ही कार्यकर्त्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत १७ लोकांना अटक करण्यात आली आहे, इतरांचा शोध सुरू आहे.