नवी दिल्ली : भाजपने यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींचा १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. या दिवशी देशभरात सामाजिक सेवेचे अनेक कार्यक्रम होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा सेवा दिवस म्हणून साजरा करावा. 


अमित शाह यांनी १७ सप्टेंबरला कार्यकर्त्यांना देशभरात सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यास सांगितलं आहे. अमित शाह तेलंगणामध्ये स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत.