लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने 155 उम्मेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने  403 पैकी 304 उमेदवारांची घोषणा आतापर्यंत केली आहे.


या यादीत राजनाथ सिंह यांचा मुलगा याचं देखील नाव आहे. पंकज सिंह हा नोएडा येथून निवडणूक लढणार आहे. रीता बहुगुणा जोशी यांना लखनऊ कैंटमधून उमेदवारी मिळाली आहे. सिद्धार्थ नाथ सिंह यांना इलाहाबाद वेस्ट आणि नन्द कुमार नंदी यांना इलाहाबाद साउथमधून भाजपने उमेदवारी दिली आहे.