पणजी : पणजीच्या महापालिका निवडणूकीत भाजपचा जोरदार पराभव झाल्यानं एकच खळबळ उडलायीय. लोकसभेच्या निवडणुकीत गोव्यात निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या भाजपचा बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलनं जबरदस्त धक्का दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोन्सेरात यांच्या पॅनलनं ३० पैकी १७ जागांवर विजय मिळवलाय. रविवारी झालेल्या मतदानात एकूण ७५ टक्के मतदान झालं होतं. मडगाव पाठोपाठ पणजी पालिकेत भाजपा धक्का बसल्याने भाजपा सरकारला हा एकप्रकारे इशाराच मानला जातोय.  


गोव्याची राजधानी असणाऱया पणजी महानगरपालिकेसाठी रविवारी ७५ टक्के मतदान झाल होतं. येत्या वर्षभरात गोवा विधानसभेची निवडणूक आहे. यामुळे या निवडणुकीकडे विधानसभेची सेमीफायनल म्हणून पहिले जात होतं. दरम्यान काँग्रेसला मात्र याही वेळी खातं उघडता आलेले नाही.


जनतेने नाकारल्याने गोव्यात पुन्हा एकवेळ स्थानिक पक्षाला उभारी मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने विशेष प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही.