भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक
आजपासून उत्तरप्रदेशमध्ये भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरु होतीये. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलंय.
लखनऊ :आजपासून उत्तरप्रदेशमध्ये भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरु होतीये. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलंय.
या बैठकीच्या अनुशंगानं शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदार सहभागी होणार असून राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे डावपेच यावेळी ठरविले जाऊ शकतात.
विशेष म्हणजे आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे हिमंत बिस्वा शर्मा, तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा या काँग्रेसमधून भाजपत आलेल्यांचाही या कार्यकारिणीत समावेश करण्यात येणार आहे..