कोलकत्यात ३३ लाखांच्या नोटांसह भाजप नेत्याला अटक
कोलकता पोलिसांनी भाजपचे नेते मनीष शर्मा ३३ लाख रुपयांच्या नव्या नोटांसह अटक केले आहे. ३३ लाख रुपयांची रक्कम २ हजार रुपयांच्या नोटांच्या रुपात होता.
कोलकता : कोलकता पोलिसांनी भाजपचे नेते मनीष शर्मा ३३ लाख रुपयांच्या नव्या नोटांसह अटक केले आहे. ३३ लाख रुपयांची रक्कम २ हजार रुपयांच्या नोटांच्या रुपात होता.
मनीष शर्मा बर्दवान जिल्ह्यातील राणीगंजचे राहणारे आहेत. त्यांच्यासह पोलिसांनी सहा कोळसा माफियांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत.
त्यांना उत्तर कोलकताच्या एका अपार्टमेंटमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांना संशय होता की काळे पैसे पांढरे करण्यासाठी कोलकता येथे आले होते.